आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा; पूर्ततेसाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित


आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा; पूर्ततेसाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित

आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईतील वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली.

बैठकीत विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्याबाबत सविस्तर विचारविनिमय झाला.

आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासोबतच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी राज्य सरकार सकारात्मक असून, त्यांच्या प्रश्नांवर योग्य तोडगा काढण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

यावेळी मंत्री डॉ. अशोक उईके यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!