गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीत प्लाझ्मा-लेझरला ‘नो एंट्री’; पुणे ग्रामीण पोलिसांचा कडक निर्णय


गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीत प्लाझ्मा-लेझरला ‘नो एंट्री’; पुणे ग्रामीण पोलिसांचा कडक निर्णय

पुणे : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी विसर्जन मिरवणुकांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मिरवणुकीदरम्यान प्लाझ्मा आणि लेझर किरणांचा वापर पूर्णपणे बंद करण्यात आला असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गणेश मंडळांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
ध्वनी तसेच प्रकाश प्रदूषणाचा नागरिकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे काटेकोर पालन करण्याच्या दृष्टीने पोलिसांकडून गणेश मंडळांना आवश्यक सूचना देण्यात येणार आहेत.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गील यांनी याबाबत स्पष्ट भूमिका मांडली असून, उत्सव साजरा करताना नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे सांगितले आहे. मिरवणुकीत बंदी असलेल्या प्लाझ्मा किंवा लेझरचा वापर आढळल्यास संबंधित मंडळावर नियमानुसार कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
गणेशोत्सव उत्साहात साजरा करताना ध्वनी व प्रकाश प्रदूषण टाळून नागरिकांची सुरक्षितता आणि आरोग्याला प्राधान्य द्यावे, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!