लँड बँक प्रोजेक्ट २०२६’चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन


विकसित महाराष्ट्र, हरित महाराष्ट्र!
‘लँड बँक प्रोजेक्ट २०२६’चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई, दि. २ सप्टेंबर २०२६ : विकासाला गती देतानाच पर्यावरण संवर्धनाचा समतोल साधण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महसूल आणि वन विभागाच्या समन्वयातून तयार केलेल्या **‘लँड बँक प्रोजेक्ट २०२६’**चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मंत्रालयात करण्यात आले.
या प्रणालीमुळे पर्यायी वनीकरणासाठी आवश्यक असलेल्या अवनत वनजमिनी तसेच वनेत्तर जमिनीची जिल्हानिहाय माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पर्यायी वनीकरणाची प्रक्रिया अधिक गतिमान होण्यासोबतच विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या अंमलबजावणीतील विलंब कमी होण्यास मदत होणार आहे.
राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये एकूण ४० हजार ६०२ हेक्टर जमीन पर्यायी वनीकरणासाठी उपलब्ध करण्यात आली आहे. या जमिनीची माहिती एकाच प्रणालीवर उपलब्ध झाल्याने प्रकल्पांसाठी आवश्यक जमीन निश्चित करणे आणि पर्यायी वनीकरणाची कार्यवाही करणे अधिक सुलभ होणार आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गणेश नाईक तसेच मंत्रिमंडळातील अन्य सदस्य आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!