सुट्ट्या खाद्यतेल विक्रीवरील बंदीला तूर्तास ब्रेक; व्यापाऱ्यांना आणखी वर्षभराची मुदतवाढ


सुट्ट्या खाद्यतेल विक्रीवरील बंदीला तूर्तास ब्रेक; व्यापाऱ्यांना आणखी वर्षभराची मुदतवाढ

मुंबई : अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्तपद स्वीकारल्यानंतर सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्यातील सुट्ट्या (Loose) खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे लहान व्यापारी आणि व्यावसायिकांवर आर्थिक परिणाम होत असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत होते.
व्यापाऱ्यांच्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने या निर्णयात बदल करत सुट्टे खाद्यतेल विक्रीसाठी आणखी एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील व्यापाऱ्यांना तूर्तास मोठा दिलासा मिळाला असून, सुट्ट्या खाद्यतेलाच्या विक्रीसाठी त्यांना आणखी वर्षभराची संधी मिळणार आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे तुकाराम मुंढे यांनी घेतलेल्या बंदीच्या निर्णयाला काही काळासाठी स्थगिती मिळाल्याचे मानले जात आहे. दरम्यान, खाद्यतेलाच्या विक्रीमध्ये ग्राहकांचे आरोग्य आणि अन्नसुरक्षेचे नियम कायम ठेवणे हेही महत्त्वाचे ठरणार आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!