MPSC पेपरफुटी प्रकरणातील मुख्य संशयित ऋतुजा पाटील नंदुरबारमधून ताब्यात


MPSC पेपरफुटी प्रकरणातील मुख्य संशयित ऋतुजा पाटील नंदुरबारमधून ताब्यात

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अन्न व औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणात मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित ऋतुजा पाटील हिला नंदुरबार येथून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणात आतापर्यंत तीन अधिकाऱ्यांसह सहा जणांना अटक करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. पेपरफुटी प्रकरणाच्या तपासादरम्यान ऋतुजा पाटील हिची भूमिका महत्त्वाची असल्याने पोलिसांनी तिचा शोध घेतला होता.

दरम्यान, या प्रकरणातील तक्रारदार ऋषिकेश गांगुर्डे यांनी गंभीर आरोप केला आहे. प्रकरणाला प्रेमसंबंधांचा रंग देऊन मूळ पेपरफुटीचा मुद्दा दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

या प्रकरणातील कथित पेपरफुटी, त्यामागील नेटवर्क आणि संबंधित व्यक्तींच्या भूमिकेचा मुंबई पोलिसांकडून तपास सुरू आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!