विक्रोळीत महिलेची हत्या करून मृतदेह दुकानात लपवला; आरोपीला अटक
मुंबई : विक्रोळीतील कन्नमवार नगर परिसरात २५ ऑगस्टपासून बेपत्ता असलेल्या सुनिता मोरे (२१) या महिलेचा मृतदेह बंद दुकानात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळला.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, सुनिता मोरे हिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्यानंतर तो अयशस्वी ठरल्याने शेजारी राहणाऱ्या फजूल रहमान मेहरबान कुरेशी याने तिची हत्या केल्याचा संशय आहे. हत्येनंतर मृतदेह दुकानात लपवण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.
घटनेची माहिती मिळताच विक्रोळी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपीला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून हत्येमागील नेमके कारण आणि घटनेशी संबंधित इतर बाबींचा पोलीस तपास करत आहेत.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
Views: 41






