सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य आनंदी, निरोगी आणि समाधानाचे जावे’.


सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य आनंदी, निरोगी आणि समाधानाचे जावे’


पिंपरी-चिंचवड महापालिकेतील ३८ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सेवेत अनेक वर्षे प्रामाणिकपणे योगदान देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सेवाकाळ हा प्रेरणादायी आहे. सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य आनंदी, निरोगी आणि समाधानाचे जावे, अशा शुभेच्छा महापालिकेचे उपायुक्त संदीप खोत यांनी दिल्या.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या २८ तसेच स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या १० अशा एकूण ३८ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार व निरोप समारंभ आचार्य अत्रे रंगमंदिर, संत तुकारामनगर येथे उत्साहात झाला. यावेळी उपायुक्त संदीप खोत यांच्या हस्ते सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
महापालिकेच्या विविध विभागांमध्ये दीर्घकाळ सेवा बजावलेल्या कर्मचाऱ्यांच्या योगदानाची यावेळी आठवण करण्यात आली. सेवा काळात केलेले काम आणि महापालिकेच्या विकासासाठी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील, असेही यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमास मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, कर्मचारी महासंघाच्या उपाध्यक्षा सुप्रिया सुरगुडे, महादेव बोत्रे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
स्वेच्छानिवृत्ती घेतलेले अधिकारी-कर्मचारी
यामध्ये ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र मंडपे, उपअभियंता सत्वशील शितोळे, राजश्री गायकवाड, रोहिदास जमदाडे, संजू साळवे, दत्तात्रय ढगे, सुभाष गायकवाड, रामदास तळपे, पांडुरंग झांजरे, सीताराम लांडे आदींचा समावेश आहे.
तसेच विविध विभागांतील लघुलेखक विजयश्री देसाई, मुख्याध्यापिका सविता पवार, प्रमिला जाधव, प्रतिभा वलटे, सुजाता कर्जतकर, विद्या कातोरे, सुनीता गिते, कार्यालय अधीक्षक संजय गरारे, लेखापाल सुचेता कुलकर्णी, रवींद्र बोऱ्हाडे, मुख्य आरोग्य निरीक्षक सुनील वाटाडे यांच्यासह अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

प्रतिनिधी: शाम शिरसाठ पुणे


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!