जन्मदिनाच्या दिवशी उपसभापतीपदाची अनोखी भेट; सामान्य कार्यकर्ता ते उपसभापती अशी नानासाहेब आबनावे यांची भरारी
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी मा. नानासाहेब आबनावे यांची निवड झाल्याबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
चर्मकार समाजातील एक सामान्य कार्यकर्ता म्हणून समाजात आपली ओळख निर्माण करणाऱ्या नानासाहेब आबनावे यांनी सामाजिक, आध्यात्मिक आणि जनहिताच्या क्षेत्रात सातत्याने कार्य करत आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर उपसभापतीपदापर्यंत भरारी घेतली आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल चर्मकार समाजाच्या वतीने जितेंद्र आबनावे (हडपसर) यांच्या हस्ते मा. नानासाहेब आबनावे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदाच्या पुढील कार्यकाळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
विशेष म्हणजे, जन्मदिनाच्या दिवशीच उपसभापतीपदाची जबाबदारी मिळाल्याने हा दिवस नानासाहेब आबनावे यांच्यासाठी दुहेरी आनंदाचा ठरला आहे. एक सामान्य कार्यकर्ता ते उपसभापती अशी त्यांनी घेतलेली भरारी चर्मकार समाजासह सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
विजय अडसूळ प्रतिनिधी
9623113336.








