अखिल भारतीय पेशवा संघटनेतर्फे ६ सप्टेंबरला जालन्यात १९ वा मोफत राज्यस्तरीय वधू-वर मेळावा
जाटना :अखिल भारतीय पेशवा संघटनेच्या वतीने सर्वशाखीय ब्राह्मण समाजासाठी १९ व्या मोफत राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन रविवारी, दिनांक ६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत ब्राह्मण सभा कार्यालय, चमन, जालना येथे करण्यात आले आहे.
आतापर्यंत १८ मेळावे यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर या १९ व्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचे उद्घाटन ब्राह्मण सभेचे अध्यक्ष रमेशजी देहेडकर यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आर. आर. जोशी, धनंजय नारळे, दीपक कासांडे, अभय जोशी, संतोष जोशी, अभय पटवारी, रवींद्र पंडित, उदय खांडेकर, रामेश्वर सेलुकर आणि संजय देशपांडे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती स्वागत अध्यक्ष श्री. सचिन वाडे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला श्री. सचिन वाडे पाटील, रमेश देहेडकर आणि संतोष जोशी यांची उपस्थिती होती.
या मेळाव्यात सर्वशाखीय ब्राह्मण समाजातील प्रथम वधू-वर, घटस्फोटीत, विधवा, विधुर तसेच दिव्यांग उमेदवारांची नावनोंदणी सुरू आहे. ही नावनोंदणी प्रत्यक्ष स्वरूपात करता येणार आहे. इच्छुकांनी आपली नावनोंदणी करून मेळाव्याच्या दिवशी वधू-वरांसह पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अखिल भारतीय पेशवा संघटना आणि वधू-वर मेळावा आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी




