निर्माल्य कुंड गायब; झाडांखाली भग्न मूर्ती, फोटों प्रशासकीय दुर्लक्षामुळे धार्मिक भावनांशी खेळ


निर्माल्य कुंड गायब; झाडांखाली भग्न मूर्ती, फोटों
प्रशासकीय दुर्लक्षामुळे धार्मिक भावनांशी खेळ

पुणे | प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी
नदीपात्रातील प्रदूषण रोखण्यासह धार्मिक साहित्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेच्या वतीने शहरातील विविध ठिकाणी उभारण्यात आलेली निर्माल्य कुंडे गेल्या दोन वर्षांपासून अनेक ठिकाणी गायब झाल्याचे चित्र आहे. परिणामी, नागरिक आणि भाविकांकडून वड-पिंपळाच्या झाडांखाली तसेच नदीकिनारी भग्न देवमूर्ती, जुने फोटो, हार-फुले आणि अन्य निर्माल्य ठेवले जात असल्याने अस्वच्छतेबरोबरच धार्मिक भावनांचा प्रश्न निर्माण झाला आहे.
त्यामुळे भाविकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
काही वर्षांपूर्वी नदी आणि सार्वजनिक परिसर स्वच्छ ठेवण्याच्या उद्देशाने प्रशासनाने निर्माल्य कुंडांची व्यवस्था केली होती. त्यामुळे नागरिक नदीपात्रात किंवा रस्त्याच्या कडेला धार्मिक साहित्य टाकण्याऐवजी या कुंडांचा वापर करत होते. मात्र, देखभाल-दुरुस्तीअभावी किंवा प्रशासकीय दुर्लक्षामुळे अनेक ठिकाणची कुंडे आता दिसेनाशी झाली आहेत.

योग्य पर्याय उपलब्ध नसल्याने सार्वजनिक ठिकाणी धार्मिक साहित्याचे ढीग निर्माण होत आहेत. झाडांखाली, भिंतीलगत आणि नदीकिनारी भग्न मूर्ती व देवतांचे फोटो उघड्यावर पडून राहत असल्याने परिसराचे विद्रुपीकरण होत असून स्वच्छतेचाही प्रश्न गंभीर बनला आहे.

नागरिकांच्या धार्मिक भावना आणि सार्वजनिक स्वच्छतेचा विचार करून महापालिकेने शहरातील प्रमुख ठिकाणी निर्माल्य कुंडे तातडीने पुन्हा उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी होत आहे. तसेच जमा होणारे निर्माल्य, भग्न मूर्ती आणि धार्मिक साहित्य नियमितपणे संकलित करून धार्मिक रोतीने विल्हेवाट लावण्याची व्यवस्था करावी, अशीही मागणी नागरिकांनी केली आहे.

प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी
9822548429


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!