श्री भगवंत महोत्सव मंडळ, पुणे च्या अध्यक्षपदी सेवानिवृत्त IAS अधिकारी ॲड. श्री अरुण उन्हाळे यांची निवड


श्री भगवंत महोत्सव मंडळ, पुणे च्या अध्यक्षपदी सेवानिवृत्त IAS अधिकारी ॲड. श्री अरुण उन्हाळे यांची निवड

पुणे:श्री  भगवंत महोत्सव मंडळ, पुणे च्या तत्कालिन अध्यक्ष ओंकार एकशिंगे यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर आज सारसबाग, पुणे येथे अध्यक्ष निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या विशेष सभेत मंडळाच्या नूतन अध्यक्षपदी मंडळाचे उपाध्यक्ष तथा सेवानिवृत्त IAS अधिकारी ॲड. अरुण उन्हाळे यांची एकमताने निवड करण्यात आली.

​मंडळाच्या इतर मुख्य पदाधिकारी निवडी खालीलप्रमाणे करण्यात आल्या:

  • अध्यक्ष: ॲड. अरुण उन्हाळे (सेवानिवृत्त IAS अधिकारी)
  • उपाध्यक्ष: संजय जगदाळे
  • सचिव: प्रविण शिरसीकर
  • खजिनदार: देवदत्त मोरे

​निवड प्रक्रियेनंतर मंडळाच्या वतीने नूतन अध्यक्ष ॲड. अरुण उन्हाळे, उपाध्यक्ष संजय जगदाळे आणि सचिव प्रविण शिरसीकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

प्रतिनिधी: उमेश कुलकर्णी


51
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!