पिंपळे सौदागर येथील सहकार दरबारात डॉ. ॲड. कणाद लहाने यांचा सत्कार


पिंपळे सौदागर येथील सहकार दरबारात डॉ. ॲड. कणाद लहाने यांचा सत्कार

पिंपळे सौदागर : येथील आयोजित सहकार दरबारात सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ. ॲड. कणाद लहाने यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून त्यांना पीएच.डी. पदवी प्रदान झाल्याबद्दल पुणे जिल्हा को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग अँड अपार्टमेंट फेडरेशनचे खजिनदार चारुहास कुलकर्णी यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी गणेश रेसिडन्सीज, जरवरी, पर्वसाक्षी आदी गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनीही डॉ. ॲड. कणाद लहाने यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
तसेच लिओपॉट को-ऑपरेटिव्ह सोल्युशन्सचे संचालक डॉ. महेंद्र सेठी आणि एक्स्पर्ट डायरेक्टर इंजि. अभिजित कुलकर्णी यांच्या हस्तेही डॉ. ॲड. लहाने यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी सहकार कायद्यावरील डॉ. ॲड. कणाद लहाने यांची सखोल पकड तसेच सहकारी चळवळीमध्ये त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाचे कौतुक केले. सहकार क्षेत्राला त्यांचे मौल्यवान मार्गदर्शन यापुढेही सातत्याने मिळत राहावे, अशी सदिच्छा व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, नाशिक फाटा सहकार दरबाराचे आयोजक इंजि. अभिजित कुलकर्णी यांनी डॉ. ॲड. कणाद लहाने यांना नाशिक फाटा येथे आयोजित करण्यात येणाऱ्या सहकार दरबारात उपस्थित राहून सहकारी संस्था व सभासदांना मार्गदर्शन करण्यासाठी वेळ द्यावा, अशी विशेष विनंती केली.
पीएच.डी. पदवी प्राप्त झाल्याबद्दल सहकार क्षेत्रातील विविध मान्यवर, गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी आणि सभासदांनी डॉ. ॲड. कणाद लहाने यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

प्रतिनिधी अभिजित कुलकर्णी


51
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!