आमदार शंकर जगताप यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेवर नियुक्ती
आमदार शंकर जगताप यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेवर नियुक्ती
पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी) : चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर पांडुरंग जगताप यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठान, पुणे अंतर्गत नियामक परिषद (Governing Council) वर पदसिद्ध सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे अधिकृत पत्र जिल्हा खनिकर्म अधिकारी तथा सदस्य सचिव यांनी जारी केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या अधिसूचनेनुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचा विधानसभेतील कार्यकाळ संपेपर्यंत किंवा ते या पदावर असेपर्यंत ही नियुक्ती कायम राहणार आहे.
जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या माध्यमातून खनिज विकास निधीचा योग्य विनियोग, खनिजप्रभावित क्षेत्रांचा विकास तसेच विविध लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यामध्ये नियामक परिषदेची महत्त्वपूर्ण भूमिका असते.
आमदार शंकर जगताप यांची या महत्त्वपूर्ण परिषदेवर नियुक्ती झाल्याबद्दल राजकीय व सामाजिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429




