जालना येथे अखिल भारतीय पेशवा संघटनेचा १९वा वधू-वर परिचय मेळावा उत्साहात संपन्न


जालना येथे अखिल भारतीय पेशवा संघटनेचा १९वा वधू-वर परिचय मेळावा उत्साहात संपन्न

जालना (प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी) :
अखिल भारतीय पेशवा संघटनेच्या वतीने जालना येथे १९वा वधू-वर परिचय मेळावा उत्साहात पार पडला. जालना येथील ब्राह्मण सभा भवनात आयोजित या मेळाव्यास समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी २९१ वर आणि ५९ वधूंनी नोंदणी करून प्रत्यक्ष परिचय दिला.
करिअरच्या नावाखाली विवाहाचे वय लांबवणे तसेच विवाहाबाबत वाढलेल्या अवास्तव अपेक्षांमुळे शिक्षित असूनही अनेक तरुण-तरुणी विवाहापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे ब्राह्मण समाजातील मुलींनी योग्य वयात विवाहाचा निर्णय घ्यावा, असे आवाहन मेळाव्याचे अध्यक्ष रमेश देहेडकर यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात भगवान श्री परशुराम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. मेळाव्याचे प्रास्ताविक सचिन वाडे पाटील यांनी केले.
रमेश देहेडकर यांनी विवाहासाठी वाढलेल्या अवास्तव अपेक्षांवर भाष्य करताना स्वतंत्र फ्लॅट, वार्षिक १५ लाख रुपयांचे उत्पन्न, मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरात स्थायिक असलेला वर आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या नकोत, अशा अपेक्षांमुळे विवाहाचा प्रश्न गंभीर होत असल्याचे सांगितले.
यावेळी छत्रपती संभाजीनगरचे भाजप संघटन मंत्री भाऊसाहेब देशमुख, सचिन वाडे पाटील, श्रीकांत शेलगावकर, सिद्धीविनायक मुळे, डॉ. संजय रुईखेडकर, संतोष जोशी, रविंद्र पंडित, धनंजय नारळे आणि दीपक कासंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सिद्धीविनायक मुळे आणि डॉ. संजय रुईखेडकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

पत्रकार : उमेश कुलकर्णी
संपर्क : ९८२२५४८४२९


51
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!