वाढदिवसाच्या पार्टीसाठी चोरी; नागपुरात चौघांना ताब्यात
नागपूर : मित्राचा वाढदिवस फार्महाऊसवर साजरा
करण्यासाठी पैसे कमी पडल्याने कॅफे आणि पानठेल्यांवर चोरी करणाऱ्या टोळीचा नागपूर क्राईम ब्रांचने पर्दाफाश केला. या प्रकरणात तीन तरुणांसह वाढदिवसाचा ‘बर्थडे बॉय’ असलेल्या एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.
कोतवाली आणि सक्करदरा परिसरातील विविध दुकानांमधून रोख रक्कम तसेच सिगारेटची पाकिटे चोरी करण्यात आली होती. चोरीचा माल विकण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी सापळा रचून चौघांना ताब्यात घेतले. या कारवाईमुळे वाढदिवसाच्या पार्टीसाठी चोरी करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
Views: 26







