बाबा खाटू श्याम यांच्या जीवनावर चित्रपट; २०२७ मध्ये होणार प्रदर्शित
बाबा खाटू श्याम यांच्या जीवनावर आधारित नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. ‘हरे का सहारा बाबा श्याम हमारा’ असे या चित्रपटाचे नाव असून, हा चित्रपट २०२७ मध्ये प्रदर्शित होणार आहे.
नीम करौली बाबांच्या जीवनावरील ‘हनुमान अंश’ या चित्रपटाच्या यशानंतर या नव्या आध्यात्मिक चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. याचबरोबर साईबाबांच्या जीवनावर आधारित ‘तेरा साई’ या चित्रपटाचीही घोषणा करण्यात आली आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
Views: 49







