गुळवे मैदान पाण्याची टाकी कामाचा आढावा – महापौर रवि भाऊ लांडगे.


गुळवे मैदान पाण्याची टाकी कामाचा आढावा – महापौर रवि भाऊ लांडगे.
चक्रपाणी वसाहतीतील पाणीपुरवठ्याच्या प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष पाहणी करून पाण्याच्या टाक्यांच्या कामांचा आढावा घेतला.

एका पाण्याच्या टाकीचे बांधकाम पूर्ण झाले असून, ती कार्यान्वित करण्यातील तांत्रिक व इतर अडचणी तातडीने दूर करून टाकी लवकरात लवकर सुरू करण्याच्या स्पष्ट सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच दुसऱ्या टाकीचे सुरू असलेले बांधकामही गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

चक्रपाणी वसाहतीतील नागरिकांना नियमित, पुरेसा आणि सुरळीत पाणीपुरवठा मिळावा, ही आमची प्राथमिकता असून त्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना तातडीने पूर्ण करण्यात येतील.
यावेळी नगरसेवक सागर गवळी, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
प्रतिनिधी विजय अडसूळ


51
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!