संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त कीर्तन व महाप्रसाद उत्साहात
संत सेना महाराज महिला बचत गटाचे उद्घाटन
भोसरी : संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त येथील संत सेना महाराज मंदिरात कीर्तन व महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने संत सेना महाराज महिला बचत गटाचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले.
या कार्यक्रमास नगरसेविका सौ. कविताताई भोंगाळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या सरचिटणीस रोहिणीताई मांढरे याही उपस्थित होत्या.
संत सेना महाराज मंदिर, भोसरी येथील महिला मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन केले. महिला मंडळाच्या अध्यक्षा स्नेहाताई निलेश गायकवाड, उपाध्यक्षा मोहिनीताई आशिष उरकुटकर, खजिनदार भारतीताई सोमनाथ रसाळ आणि उपाध्यक्षा भारतीताई योगेश सांगळे यांनी आयोजनाची जबाबदारी सांभाळली.
तसेच महिला मंडळाच्या लताताई गायकवाड, छायाताई जाधव, आशाताई शेळके, पुष्पाताई भालेकर, चंद्रभागाताई गायकवाड, मंगलताई रसाळ, सुजाताताई झुंजुर्के, मंदाताई घायतडक, पुनमताई बिडवे, उषाताई भटकर, मायाताई पंडित, भारतीताई पंडित, इंदुताई विरनक, रूपालीताई कुटे व प्रमिलाताई रसाळ यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.
संत सेना महाराज मंदिर व्यवस्थापनामध्ये अध्यक्ष नाना रायकर, उपाध्यक्ष निलेश भीष्म गायकवाड, तसेच विश्वस्त, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही कार्यक्रमाच्या आयोजनात सक्रिय सहभाग घेतला.
सर्व पदाधिकारी, महिला मंडळाच्या सदस्य व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त आयोजित कीर्तन व महाप्रसाद कार्यक्रम भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
प्रतिनिधी विजय अडसूळ





