इच्छित कॉलेजमध्ये प्रवेश न मिळाल्याने ठाण्यात १७ वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या


इच्छित कॉलेजमध्ये प्रवेश न मिळाल्याने ठाण्यात १७ वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या

ठाणे : बारावीच्या परीक्षेत ९५.७ टक्के गुण मिळवूनही अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेत इच्छित महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्याने निराश झालेल्या १७ वर्षीय विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलल्याची दुर्दैवी घटना ठाण्यातील कासारवडवली परिसरात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेत अपेक्षित महाविद्यालयात प्रवेश मिळू न शकल्याने संबंधित विद्यार्थी काही काळापासून निराश होता. त्यानंतर त्याने कुटुंबाच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर संदेश पाठविल्याचे समोर आले आहे. त्यानंतर त्याने इमारतीच्या २३ व्या मजल्यावरून उडी घेतली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कासारवडवली पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. कुटुंबीयांनी कोणताही संशय व्यक्त केलेला नसल्याचे सांगण्यात आले आहे.
ही घटना विद्यार्थ्यांवरील शैक्षणिक आणि प्रवेश प्रक्रियेच्या दबावाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारी आहे. गुण, प्रवेश किंवा करिअरमधील अपयश हे आयुष्यापेक्षा मोठे नसते. विद्यार्थ्यांमध्ये तणावाची लक्षणे दिसल्यास पालकांनी त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधणे आणि आवश्यक असल्यास समुपदेशकांची मदत घेणे गरजेचे आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


51
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!