भोकरमध्ये ऋषी छल्लारे फाउंडेशनतर्फे उद्या मोफत ‘महा-आयडी’ सुविधा..,. नागरीकांनी लाभ घेण्याचे कामगार नेते गणेश छल्लारे यांचे अवाहन..


भोकरमध्ये ऋषी छल्लारे फाउंडेशनतर्फे उद्या मोफत ‘महा-आयडी’ सुविधा..,. नागरीकांनी लाभ घेण्याचे कामगार नेते गणेश छल्लारे यांचे अवाहन

टाकळीभान प्रतिनीधी – महाराष्ट्र शासनाच्या डिजिटल प्रशासनाच्या दिशेने सुरू असलेल्या ‘महा-आयडी’ डिजिटल ओळख उपक्रमाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच नागरिकांना महा-आयडी तयार करण्यास सहकार्य मिळावे, या उद्देशाने ऋषी छल्लारे फाउंडेशन, भोकर यांच्या वतीने नागरिकांसाठी मोफत ‘महा-आयडी कार्ड’ सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहीती गणेश छल्लारे यांनी दिली आहे.

लोकनेते माजी आमदार भानुदासजी मुरकुटे साहेब यांच्या नेतृवखाली व शिवसेना पक्षाचे युवानेते निरज मुरकुटे यांच्या सहकार्याने शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ऋषी छल्लारे फाउंडेशनच्या कार्यालयात मोफत उपलब्ध राहणार आहे. फाउंडेशनचे कार्यालय नवीन तलाठी कार्यालयासमोर, भोकर येथे आहे. ‘महा-आयडी’च्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय सेवा व योजनांचा डिजिटल पद्धतीने लाभ घेणे अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे. डिजिटल ओळख व्यवस्थेमुळे शासकीय योजनांसाठी अर्ज करताना आवश्यक माहिती व कागदपत्रांची पुनरावृत्ती कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. विद्यार्थी, शेतकरी, महिला, कामगार तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे.

नागरिकांना डिजिटल पद्धतीने शासकीय सेवांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, तसेच ‘महा-आयडी’ उपक्रमाची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी, या हेतूने फाउंडेशनने ही मोफत सुविधेचे आयोजत केले आहे.

भोकर व पंचक्रोशीतील नागरिकांनी दि. ११ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत फाउंडेशनच्या कार्यालयात उपस्थित राहून या मोफत सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्व, ऋषी छल्लारे फाउंडेशनचे गणेश छल्लारे यांचे वतीने करण्यात आले आहे.

प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर


51
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!