PMPML चे बनावट ॲप तयार करून मोफत प्रवासाचा प्रयत्न


PMPML चे बनावट ॲप तयार करून मोफत प्रवासाचा प्रयत्न
IT विद्यार्थ्याने बनवले PMPMLचे बनावट ॲप; मोफत बस प्रवासाचा भांडाफोड

पुणे : कोडिंग कौशल्याचा गैरवापर करत पीएमपीएमएलच्या अधिकृत ॲपसारखे हुबेहूब दिसणारे बनावट मोबाइल ॲप आणि बनावट डेली पास तयार करून मोफत बस प्रवास करण्याचा प्रयत्न करणाऱ्या २० वर्षीय आयटी विद्यार्थ्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
प्रथमेश बोगे असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. ३० ऑगस्ट रोजी बस कंडक्टर दत्तात्रय जयभाये यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार समोर आला. तपासणीदरम्यान डेली पास संशयास्पद वाटल्यानंतर चौकशी केली असता बनावट ॲप आणि पास तयार केल्याचे उघड झाले.
या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पीएमपीएमएल प्रशासनाने नागरिकांनी अशा बेकायदेशीर प्रकारांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच पालकांनी मुलांच्या ऑनलाइन व तांत्रिक गतिविधींवर योग्य लक्ष ठेवावे, असेही प्रशासनाने म्हटले आहे.
प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी


51
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!