भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! सप्तशृंगी गडाकडे जाणारा घाटरस्ता १७ दिवस बंद


भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! सप्तशृंगी गडाकडे जाणारा घाटरस्ता १७ दिवस बंद

नाशिक : आगामी नाशिक कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र सप्तशृंगी गड ते नांदुरी या घाटरस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे १० ते २६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे.
घाटरस्त्यावर वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने तसेच कामाच्या काळात प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत उपविभागीय अधिकारी डॉ. कशिरा संख्ये यांनी आदेश जारी केले आहेत.
या कालावधीत सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांनी प्रशासनाच्या सूचनांची दखल घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


51
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!