भंडाऱ्यात ट्रॅक्स-ट्रकच्या भीषण अपघातात ९ मजुरांचा मृत्यू
भंडारा : नागपूर-रायपूर महामार्गावर पिंपळगावजवळ ट्रॅक्स वाहनाने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत ९ जणांचा जागीच मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी झाले आहेत.
मृतांमध्ये छत्तीसगडमधील मजुरांचा समावेश असून ते नागपूरच्या दिशेने प्रवास करत होते. प्राथमिक माहितीनुसार, ट्रॅक्स चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे समोर आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना उपचारासाठी भंडारा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताबाबत पुढील तपास सुरू आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
Views: 36







