ठाण्यात घरफोडीची चोरी; चार दुकानांना चोरट्यांचे लक्ष्य


ठाण्यात घरफोडीची चोरी; चार दुकानांना चोरट्यांचे लक्ष्य

ठाणे पश्चिम : प्रतिनिधी – सिंथिया कोरिया पाचपाखाडी परिसरात चोरट्यांनी घरफोडी करून दुकानांना लक्ष्य केल्याची घटना समोर आली आहे. सतरंज वेफर्स या दुकानात घरफोडी करून चोरट्यांनी सुमारे ₹५० हजारांची रोकड लंपास केल्याची माहिती आहे.

याशिवाय नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका सलूनसह आणखी दोन दुकानांनाही चोरट्यांनी लक्ष्य केल्याची माहिती समोर येत आहे.
या घटनांमुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, नौपाडा पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
अधिकृत तपशील आणि चोरीचा नेमका आकडा पोलिसांच्या तपासानंतर स्पष्ट होणार आहे.


51
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!