आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त स्वाती पटारे यांचा सत्कार..


आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त स्वाती पटारे यांचा सत्कार

टाकळीभान प्रतिनिधी : टाकळीभान विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या वतीने आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळालेल्या स्वाती तान्हाजी पटारे- निमसे यांचा सत्कार करण्यात आला. टाकळीभानच्या कन्या व अशोकनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असलेल्या स्वाती पटारे यांना नुकताच जिल्हा परिषद अहिल्यानगरचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याने त्यांचा सोसायटीच्या वतीने जेष्ठ संचालक मंजाबापू थोरात, चेअरमन राहूल पटारे, संचालक एकनाथ पटारे, विजय कोकणे, देवदान रणनवरे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी शिक्षिका स्वाती पटारे, मंजाबापू थोरात, राहूल पटारे, बापूसाहेब पटारे, अर्जुन राऊत यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी भास्करराव कोकणे, अविनाश लोखंडे,सचिव रामनाथ ब्राम्हणे, पोपटराव पटारे, तान्हाजी पटारे, मच्छिंद्र पटारे, अनिल पटारे, जितेंद्र पटारे, विशाल पटारे, भाऊसाहेब पटारे, प्रल्हाद कापसे, अण्णासाहेब दाभाडे, अप्पासाहेब रणनवरे, नंदु रणनवरे, बाळासाहेब शेळके, उत्तमराव पटारे, नारायण पटारे, गोपिनाथ पवार, सुनिल पटारे, संजय पटारे, कैलास पटारे, नानासाहेब पटारे, रवि शिरसाठ, रघुनाथ शेळके, विठ्ठल बनकर छोटू बनकर,आदी उपस्थित होते.

प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर


51
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!