वडार समाजाला मोठा दिलासा; दगडफोडीच्या गौण खनिज उत्खननाची मर्यादा ५०० ब्रास


वडार समाजाला मोठा दिलासा; दगडफोडीच्या गौण खनिज उत्खननाची मर्यादा ५०० ब्रास

मुंबई : पारंपरिक दगडफोडी आणि उत्खननाच्या व्यवसायावर अवलंबून असलेल्या वडार समाजाला राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. गौण खनिजांच्या उत्खननासाठी आकारण्यात येणाऱ्या स्वामित्वधन अर्थात रॉयल्टीमध्ये वाढीव सवलत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
या निर्णयानुसार पारंपरिक दगडफोडी व उत्खननासाठी असलेली वार्षिक उत्खननाची मर्यादा २०० ब्रासवरून वाढवून ५०० ब्रास करण्यात येणार आहे. त्यामुळे या पारंपरिक व्यवसायावर अवलंबून असलेल्या समाजघटकांना आर्थिकदृष्ट्या मोठा दिलासा मिळणार आहे.
यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल (गौण खनिजांचे उत्खनन व ती काढणे) नियम, १९६८ मध्ये आवश्यक सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
राज्यातील वडार समाजाच्या पारंपरिक व्यवसायाला संरक्षण आणि प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. हा निर्णय महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाशी संबंधित आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


64
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!