भोसरी-आळंदी रोडवर वाहतूक कोंडीचा विळखा; नागरिक त्रस्त, ठोस उपाययोजनांची मागणी


भोसरी-आळंदी रोडवर वाहतूक कोंडीचा विळखा; नागरिक त्रस्त, ठोस उपाययोजनांची मागणी

भोसरी : भोसरी येथील मुख्य बाजारपेठ असलेल्या आळंदी रोड ते मेगाजिन चौक या मार्गावर होणारी वाहतूक कोंडी ही नागरिकांसाठी रोजची डोकेदुखी ठरत आहे. सकाळी १२ ते २ तसेच सायंकाळी ६ ते ९ या गर्दीच्या वेळेत कंपनी व शाळा सुटण्याच्या वेळी या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.
सायंकाळच्या वेळेत रस्त्याच्या कडेला बेशिस्तपणे वाहने पार्क केली जात असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. तसेच फुटपाथवर व्यापारी व फेरीवाल्यांनी केलेल्या अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांना चालणेही कठीण झाले आहे. रस्ता ओलांडताना नागरिकांना जीव धोक्यात घालून मार्ग काढावा लागत आहे.
या समस्येवर केवळ वरवरच्या उपाययोजना करून उपयोग होणार नाही. प्रशासनाने कायमस्वरूपी व ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. गर्दीच्या वेळेत वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांचे नियोजन व सहकार्य आवश्यक आहे, अशी मागणी शिवसैनिक तथा विभागप्रमुख सुधीर शेळके यांनी केली आहे.

प्रतिनिधी विजय अडसूळ


64
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!