दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा अखिल भारतीय पेशवा संघटनेतर्फे सत्कार


दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा अखिल भारतीय पेशवा संघटनेतर्फे सत्कार

पैठण : अखिल भारतीय पेशवा संघटनेतर्फे दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला प्रोत्साहन मिळावे तसेच त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रेरणा मिळावी, या उद्देशाने या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांनी भविष्यातही शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग यश संपादन करून आपल्या कुटुंबासह समाजाचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा उपस्थित मान्यवरांनी दिल्या.
कार्यक्रमास अखिल भारतीय पेशवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश धर्माधिकारी, तालुकाध्यक्ष उपेंद्र मधूलवाडकर तसेच ज्येष्ठ नागरिक शहराध्यक्ष पोपटराव कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करताना, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान हा केवळ विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाचा गौरव नसून इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारा सामाजिक उपक्रम आहे, असे मत व्यक्त केले.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


64
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!