नव महाराष्ट्र मित्र मंडळाच्या शारदीय नवरात्र उत्सवाला लांडेवाडीत उत्साहात सुरुवात


नव महाराष्ट्र मित्र मंडळाच्या शारदीय नवरात्र उत्सवाला लांडेवाडीत उत्साहात सुरुवात

भोसरी : लांडेवाडी येथील नव महाराष्ट्र मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही शारदीय नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नगरसेवक विराज लांडे, विक्रांत लांडे आणि माजी आमदार विलासशेठ लांडे यांच्या नेतृत्वाखाली मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाविकांच्या उपस्थितीत उत्सवाला उत्साहात सुरुवात झाली.

या नवरात्र उत्सवात दहा दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भजन, कीर्तन, गोंधळ तसेच अन्य धार्मिक कार्यक्रमांमुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे.

उत्सवासाठी दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन देवीच्या दर्शनासाठी दर्शनरांगेचे नियोजन करण्यात आले आहे. भाविकांना कोणताही अडथळा न येता देवीचे दर्शन घेता यावे, यासाठी मंडळाकडून व्यवस्था करण्यात आली आहे.

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने लांडेवाडी परिसरात भक्तीमय आणि उत्साही वातावरण निर्माण झाले आहे.
विजय अडसूळ प्रतिनिधी


64
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!