अखिल भारतीय हिंदू महासभेच्या पिंपरी-चिंचवड शहर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या


अखिल भारतीय हिंदू महासभेच्या पिंपरी-चिंचवड शहर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

पिंपरी-चिंचवड | दि. ११ ऑक्टोबर २०२६

पिंपरी-चिंचवड शहरात अखिल भारतीय हिंदू महासभेचे संघटनात्मक कार्य अधिक व्यापक आणि मजबूत करण्याच्या उद्देशाने शहर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा कार्यक्रम थेरगाव कॉर्नर येथील हॉटेल अतिथी येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात विविध पदांवर नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय हिंदू महासभेचे कार्याध्यक्ष आनंद दवे होते. कार्यक्रमाची प्रस्तावना प्रदेश समन्वयक उमेश कुलकर्णी यांनी केली. यावेळी प्रदेश पदाधिकारी राजेंद्र देशपांडे यांची विशेष उपस्थिती होती.

कार्यक्रमात पुढील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.
१. रविंद्र कंखरे – शहर उपाध्यक्ष
२. संतोष रुपनवर – शहर संघटक
३. सुनील निळे – शहर सचिव
४. नरेंद्र सोंडकर – शहर प्रसिद्धीप्रमुख

कार्यक्रमाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. संघटनेची ध्येयधोरणे आणि उद्दिष्टे समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी संघटनात्मक बांधणी मजबूत असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
संघटनेच्या कार्यात सातत्य, शिस्त आणि एकजूट राखून प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी, असे आवाहन त्यांनी केले.

पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष राहुल मदने यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना संघटनेच्या विस्तारासाठी प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने सक्रिय योगदान देण्याची आवश्यकता व्यक्त केली.
हिंदू महासभेच्या कार्यात अधिकाधिक नागरिकांना सहभागी करून घेणे, संघटनेची उद्दिष्टे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणे यावर त्यांनी भर दिला.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पदांची जबाबदारी सक्षमपणे पार पाडून पिंपरी-चिंचवड शहरातील संघटनात्मक कार्याला नवी दिशा द्यावी, असे आवाहन राहुल मदने यांनी केले.

या नियुक्त्यांमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील अखिल भारतीय हिंदू महासभेच्या संघटनात्मक कार्याला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा कार्यक्रमात व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रदेश पदाधिकारी राजेंद्र देशपांडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या कार्यक्रमाला अखिल भारतीय हिंदू महासभेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिनिधी — उमेश कुलकर्णी 9822548429


65
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!