माळवडगाव येथे ‘सुवर्णमय बालकांची आठ वर्ष’ उपक्रम यशस्वीरीत्या संपन्न

टाकळीभान प्रतिनिधी -श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगाव येथे,प्राथमिक आरोग्य केंद्र ‘सुवर्णमय बालकांची आठ वर्ष’ उपक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला,
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्या आदेशानुसार आणि मार्गदर्शनाखाली, प्राथमिक आरोग्य केंद्र माळवाडगाव येथे सेवा संकल्प अभियान अंतर्गत प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान बाळाची सुवर्णमय 0 ते 8 वर्षे वयोगटातील बालकांच्या पालकांसाठी विशेष समुपदेशन सत्राचे आयोजन करण्यात आले.
या सत्रांतर्गत विशेषतः ANC (गरोदर माता) आणि PNC (प्रसूतीपश्चात माता) यांना बालकांचे आरोग्य, पोषण आणि लसीकरण याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. बालकांचे भविष्य सुवर्णमय करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊया असे आवाहन CDPO शोभा शिंदे, डॉ. उन्मेश लोंढे, डॉ.पी.आर. जाधव यांनी केले.
प्राथमिक आरोग्य केंद्र माळवाडगाव अंतर्गत खोकर, अशोकनगर, खानापूर, वडाळा महादेव, निपाणी वाडगाव सर्व उपकेंद्रमध्ये सदर उपक्रम घेण्यात आला. यावेळी फुलारी सिस्टर, गायकवाड सिस्टर, कोठुळे, आशा, अंगणवाडी सेविका, सर्व आरोग्य कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी माळवाडगाव येथे सर्व गरोदर माताची तपासणी व औषधोपचार करण्यात आले. उपक्रमासाठी बाल पालक व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर







