MPSC चौकशी आयोगाच्या सचिवपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती!…


MPSC चौकशी आयोगाच्या सचिवपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती!

मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची घोषणा; आंदोलकांच्या मागण्यांवर शासनाची भूमिका स्पष्ट

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान राज्याचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. तुकाराम मुंढे यांची MPSC चौकशी आयोगाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

MPSC विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा समावेश असलेला एक मसुदा तयार केला आहे. हा मसुदा आंदोलनाचे नेतृत्व करणारे आमदार रोहित पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्याची माहिती मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली.

विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू असल्याचे या घोषणेतून स्पष्ट झाले आहे. तुकाराम मुंढे यांच्या नियुक्तीनंतर चौकशी प्रक्रियेला कोणते स्वरूप मिळते आणि विद्यार्थ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर काय निर्णय होतात, याकडे आता MPSC परीक्षार्थींचे लक्ष लागले आहे.

प्रतिनिधी:  शाम शिरसाठ पुणे


65
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!