आकुर्डीतील तुळजाभवानी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाला उत्साहात सुरुवात
पहिल्याच दिवशी हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी; सचिन काळभोर व मेघा काळभोर यांच्या हस्ते महाआरती
आकुर्डी : आकुर्डी येथील प्रसिद्ध तुळजाभवानी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती. यावेळी सचिन काळभोर व मेघा सचिन काळभोर यांच्या हस्ते आई तुळजाभवानीची महाआरती करण्यात आली.
आकुर्डी येथील तुळजाभवानी मंदिरात गेल्या ५१ वर्षांपासून शारदीय नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जात आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून तुळजाभवानी मातेची ख्याती असून, आकुर्डी, निगडी तसेच परिसरातील हजारो भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे.
नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, भाविकांनी देवीचे दर्शन घेऊन नवरात्रोत्सवाला उत्साहात सुरुवात केली. सचिन काळभोर व मेघा सचिन काळभोर यांच्या हस्ते झालेल्या महाआरतीत भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवाच्या निमित्ताने मंदिरात भाविकांची मोठी रेलचेल राहणार असून, परिसरातील नागरिकांमध्ये नवरात्रोत्सवाबद्दल उत्साहाचे वातावरण आहे.
प्रतिनिधी विजय अडसूळ





