इंडिया आघाडीच्या मोर्चादरम्यान ठाकरे गटाला धक्का; प्रवक्ते आनंद दुबे यांचा राजीनामा


इंडिया आघाडीच्या मोर्चादरम्यान ठाकरे गटाला धक्का; प्रवक्ते आनंद दुबे यांचा राजीनामा

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे राष्ट्रीय प्रवक्ते आनंद दुबे यांनी सोमवारी (१२ ऑक्टोबर) पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि राष्ट्रीय प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला. इंडिया आघाडीच्या मोर्चादरम्यान घडलेल्या या राजकीय घडामोडीमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे.
आनंद दुबे हे ठाकरे गटाचे हिंदी भाषिक समाजातील प्रमुख चेहरे म्हणून ओळखले जात होते. विविध वृत्तवाहिन्यांवरील चर्चांमध्ये ते पक्षाची भूमिका मांडत असत. त्यांच्या राजीनाम्यामुळे पक्षाच्या हिंदी भाषिक जनसंपर्कावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राजीनाम्यानंतर आनंद दुबे यांनी राष्ट्रीय मुद्द्यांवर पक्षाने घेतलेल्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली. देशहिताच्या प्रश्नांवर राजकीय मतभेद असू शकतात; मात्र राष्ट्रहिताला प्राधान्य दिले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देताना त्यांनी संकटकाळात पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची दखल घ्यायला हवी होती, असे मत व्यक्त केले. याशिवाय, राष्ट्रीय महत्त्वाच्या घटनांवर पक्षाने भूमिका मांडण्याबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली
एकीकडे इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीतील पक्षांकडून एकजुटीवर भर दिला जात असताना आनंद दुबे यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. त्यांच्या निर्णयाचा ठाकरे गटाच्या संघटनात्मक कामकाजावर आणि आगामी राजकीय रणनीतीवर काय परिणाम होतो, याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, राजीनाम्यानंतर आनंद दुबे यांची पुढील राजकीय भूमिका काय असेल आणि ते अन्य कोणत्या पक्षात प्रवेश करणार का, याबाबत अद्याप स्पष्टता समोर आलेली नाही.
.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


65
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!