सोमेश्वर कारखान्यावर सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचे वर्चस्व; विरोधी पॅनेलचा पराभव


सोमेश्वर कारखान्यावर सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचे वर्चस्व; विरोधी पॅनेलचा पराभव

बारामती :श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने दणदणीत विजय मिळवला. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांसह भाजप समर्थित पॅनेलमध्ये तिरंगी लढत झाली होती. या निकालामुळे बारामती परिसरातील सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणांची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर झालेली कारखान्याची ही निवडणूक राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात होती. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलसमोर शरद पवार गटाचे युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनेल आणि पुरुषोत्तम जगताप यांच्या नेतृत्वाखालील भाजप समर्थित पॅनेलचे आव्हान होते.
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तिन्ही गटांनी सभासदांशी संपर्क साधत आपापल्या भूमिका मांडल्या होत्या. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.
या निकालामुळे सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला सहकार क्षेत्रात महत्त्वाचे यश मिळाले आहे. दुसरीकडे, विरोधी पॅनेलच्या पराभवामुळे त्यांच्या पुढील राजकीय रणनीतीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

प्रतिनिधी :  उमेश कुलकर्णी


65
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!