दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी सरकारचे नियोजन दुष्काळग्रस्तांसाठी रोजगार, पाणी आणि चारा नियोजनावर भर


दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी सरकारचे नियोजन
दुष्काळग्रस्तांसाठी रोजगार, पाणी आणि चारा नियोजनावर भर

मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण नागरिकांना पुढील सहा ते आठ महिने आधार देण्यासाठी रोजगार, अन्नसुरक्षा, पिण्याचे पाणी आणि पशुधनासाठी चारा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील वर्षा निवासस्थानी केंद्रीय पथकासोबत आढावा बैठक पार पडली.
पावसातील खंडामुळे सोयाबीन, कापूस, तूर आणि ऊस या पिकांचे नुकसान झाले असून रब्बी हंगामावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा, जलस्रोतांचे पुनरुज्जीवन आणि आवश्यकतेनुसार चारा छावण्या सुरू करण्यावर सरकारचा भर राहणार आहे.
जलसंधारणाच्या कामांतून ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती करण्याचेही नियोजन आहे. केंद्रीय पथकाने विविध दुष्काळग्रस्त जिल्ह्यांची पाहणी केली असून, त्याचा अहवाल केंद्र सरकारला सादर केला जाणार आहे. पीकविमा आणि दुष्काळी मदत लवकर मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
या बैठकीला मंत्री गिरीश महाजन, दत्तात्रय भरणे, मकरंद जाधव-पाटील आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी


65
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!