अशोक’ च्या कार्यक्षेत्रात बाहेरील लोकांमुळे वातावरण खराब : मुरकुटे

टाकळीभान : साखर कारखानदारी अडचणीत आहे, मात्र अशोकच्या कार्यक्षेत्रात बाहेरचे लोक येवून वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करीत आहे. गेली ४० वर्षे या भागात ऊसाचे क्षेत्र वाढवण्याचे काम केले त्यामुळे मोठ्या प्रमाणात ऊसाचे क्षेत्र वाढले. अशोक कारखाना परिसराची कामधेनु आहे. त्यामुळे कामधेनु वाचवण्यासाठी अशोकलाच ऊस द्यावा, असे आवाहन अशोक साखर कारखान्याचे सूत्रधार माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी केले.
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील सेवा संस्थेच्या प्रांगणात ऊस उत्पादकांच्या बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रगतशील शेतकरी बाबासाहेब बनकर होते. यावेळी शिवाजी शिंदे, राजेंद्र कोकणे, नानासाहेब लेलकर, गणेश छल्लारे, संचालक निरज मुरकुटे, मधुकर कोकणे, बापुराव त्रिभुवन, दादासाहेब कोकणे, विलास दाभाडे, प्रा. जयकर मगर, गजानन कोकणे, लहानभाऊ पवार, रावसाहेब वाघुले प्रमुख उपस्थित होते. यावेळी कारेगाव भागचे संचालक शिवाजी शिंदे, माजी उपसरपंच राजेंद्र कोकणे, प्राचार्य जयकर मगर यांनी मनोगत व्यक्त करून अशोकलाच ऊस द्यावा असे आवाहन केले.
यावेळी सुनिल बोडखे, रामकृष्ण गायकवाड, बापुसाहेब शिंदे, रंगनाथ पवार, रामनाथ पटारे, तुकाराम बोडखे, मच्छींद्र कोकणे, पाराजी पटारे, रेवननाथ कोकणे, बाळासाहेब खुरुद, प्रकाश नाईक, सुभाष पटारे, सुभाष येवले, शिवाजी पटारे, गोवर्धन पटारे, अनिल कोकणे, प्रकाशपटारे, गंगाधर बोडखे, संतोष पटारे, राजेंद्र पटारे दत्तू नाईक, ज्ञानदेव साळुंखे, मयूर पटारे आदींसह सभासद व ऊस उत्पादक उपस्थित होते.
चोकट-
राजकीय विरोधक असलो तरी ऊस अशोकलाच : कोकणे गेल्या काही वर्षांपासून श्रीरामपुरची ओळख संस्था बंद पाडणारा तालुका म्हणून झाली आहे. बाजारपेठ जिवंत ठेवणारी अशोक कारखाना ही एकमेव संस्था आज जिवंत आहे. त्यामुळे ही कामधेनु जगली पाहिजे. राजकारणात मुरकुटे यांचा राजकीय विरोधक असलो तरी आजपर्यंत ऊस अशोकलाच देत आहे. कार्य क्षेत्रातील ऊस उत्पादकांनीही कामधेनु वाचवण्यासाठी अशोकलाच ऊस द्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभेचे उत्तर अ.नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोकणे यांनी यावेळी केले.
प्रतिनिधी:दिलीप लोखंडे,श्रीरामपूर






