शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर; ३.५१ लाख शेतकऱ्यांचा समावेश


शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर; ३.५१ लाख शेतकऱ्यांचा समावेश
मुंबई : ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत ३ लाख ५१ हजार ११२ पात्र शेतकऱ्यांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे थकीत पीककर्ज माफ होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
पात्र शेतकऱ्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे, असे आवाहन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले आहे.
दरम्यान, आतापर्यंत या योजनेअंतर्गत एकूण २४.६७ लाख लाभार्थ्यांच्या याद्या प्रसिद्ध झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


65
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!