जळगावजवळ शाळकरी मुलांची छोटा हत्ती व्हॅन पलटी; ८ ते १० विद्यार्थी जखमी


जळगावजवळ शाळकरी मुलांची छोटा हत्ती व्हॅन पलटी; ८ ते १० विद्यार्थी जखमी

दोघांची प्रकृती गंभीर; उमाळा फाट्याजवळ अपघात, पालकांमध्ये चिंतेचे वातावरण
जळगाव : जळगावजवळील उमाळा फाट्याजवळ शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारे ‘छोटा हत्ती’ वाहन पलटी झाल्याने भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत ८ ते १० विद्यार्थी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती असून, त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
जखमी विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार
अपघातातील जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी जळगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह
शाळकरी मुलांची वाहतूक करताना वाहनाची क्षमता, सुरक्षिततेचे नियम आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन केले जाते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


65
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!