अंबरनाथमध्ये २५ दिवसांच्या बालकाची सुटका; चार महिलांना अटक


अंबरनाथमध्ये २५ दिवसांच्या बालकाची सुटका; चार महिलांना अटक

अंबरनाथ : अंबरनाथ येथून बेपत्ता झालेल्या २५ दिवसांच्या नवजात बालकाचा पोलिसांनी अवघ्या चार तासांत शोध घेतला. या प्रकरणी चार महिलांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे अंबरनाथ रेल्वे स्थानकावरून बालकाला ताब्यात घेतले. बालकाला गुजरात येथे नेले जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सुटका केल्यानंतर बालकाला त्याच्या आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले.
या प्रकरणात चार महिलांच्या भूमिकेचा आणि घटनेमागील कारणांचा पोलीस तपास करत आहेत.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


65
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!