जिल्हा परिषदेचे सीईओ आनंद भंडारी यांनी साधला महिलांशी संवाद

टाकळीभान प्रतिनिधी -सेवा संकल्प अभियानांतर्गत नवीन ५,००० महिला बचत गट स्थापनेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी ‘उमेद ग्रामसंवाद’ आयोजन या अनुषंगाने टाकळीभान ग्रामपंचायत कार्यालयात येथे मा. आनंद भंडारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अहिल्यानगर हे दिनांक १२ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२.०० वाजता गावांतील नागरिक, महिला व बचत गट संबंधित यंत्रणांशी ऑनलाईन ग्रामसंवाद करण्यात आले ,
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अहिल्यानगर यांनी सेवा संकल्प अभियानांतर्गत उमेद अभियानामध्ये जिल्ह्यात नवीन ५,००० महिला बचत गट स्थापन करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. सदर उद्दिष्टाची प्रभावीपणे पूर्तता करण्यासाठी उमेद अभियानाच्या माध्यामतून जिल्ह्यातील निवडक गावांमध्ये विशेष अभियानराबविण्यात येत आहे. या अनुषंगाने मा. आनंद भंडारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अहिल्यानगर हे दिनांक १२ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२.०० वाजता निवडक गावांतील नागरिक, महिला व संबंधित यंत्रणांशी ऑनलाईन ग्रामसंवाद सादला,
सदर ग्रामसंवादाची सुरुवात संबंधित गावातील उमेद अभियानामध्ये सहभागी होऊन आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणलेल्या उद्योजक / यशस्वी महिलेची यशोगाथा सादर करून करण्यात यावी. सदर यशोगाथेद्वारे उमेद अभियानामुळे महिलांच्या जीवनात झालेले आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक परिवर्तन उपस्थित महिलांसमोर प्रभावीपणे मांडण्यात यावे. तसेच ग्रामसंवादादरम्यान उमेद अभियानाच्या माध्यमातून महिलांना उपलब्ध होणारे विविध लाभ, महिला बचत गटामध्ये सहभागी होण्याचे फायदे व त्यातून मिळणाऱ्या संधी, महिलांनी उमेद अभियानाशी जोडले जाण्याची आवश्यकता तसेच उमेद अभियानाच्या माध्यमातून अहिल्यानगर जिल्ह्यात झालेली प्रगती याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले ,यामुळे अद्याप बचत गटामध्ये सहभागी नसलेल्या महिलांना बचत गटामध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.
यावेळी ग्रामविकास अधिकारी दादासाहेब भिंगारदे, प्रशासक जीवी खेडकर, साऊ एकल महिला अध्यक्ष मंगल जाधव, सीआरपी, अर्चना कोकणे , सी आर पी छाया बोडखे, माजी सरपंच अर्चना रणनवरे,प्रिया मघाडे, मंगल खरात,अर्चना मावळे,अनिता बोरुडे , सोनाली मघाडे,संगीता जोशी, कल्पना कोकणे, संगीता हापसे, उषाबाई हापसे, योगिता हापसे , रेखा कणसे, अरुणा पाबळे, सुनिता शिरसाट, अनिता लोखंडे, रेखा माने, कविता कांबळे, तिलोतमा शिंदे, पूजा गांगोडे, मंदा शिंदे, शीला चांडे, छाया चांडे, महिला वअंगणवाडी सेविका मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर







