राष्ट्रपतींकडून सहा राज्यांच्या राज्यपालांच्या नियुक्त्या; सहा राज्यांत मोठे फेरबदल
नवी दिल्ली | १३ ऑक्टोबर २०२६
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील सहा राज्यांच्या राज्यपालांच्या नियुक्त्यांमध्ये फेरबदल केले आहेत. राष्ट्रपती भवनाकडून १२ ऑक्टोबर रोजी यासंदर्भात अधिकृत प्रसिद्धिपत्रक जारी करण्यात आले. या निर्णयानुसार केरळ, तामिळनाडू, ओडिशा, कर्नाटक, उत्तराखंड आणि सिक्कीम या राज्यांमध्ये राज्यपालांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
सहा राज्यांचे राज्यपाल कोण?
केरळ : ओम प्रकाश माथुर
तामिळनाडू : राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर
ओडिशा : ब्रज मोहन राम
कर्नाटक : डॉ. सुधा यादव
उत्तराखंड : डॉ. ढाल सिंह बिसेन
सिक्कीम : दुष्यंत गौतम
कार्यभार स्वीकारल्यानंतर नियुक्त्या लागू
राष्ट्रपती भवनाच्या प्रसिद्धिपत्रकानुसार, संबंधित राज्यपाल आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारतील त्या दिवसापासून या नियुक्त्या लागू होतील.
या नियुक्त्यांमुळे संबंधित राज्यांच्या राजभवनांमध्ये प्रशासकीय बदल होणार असून, नव्या राज्यपालांच्या कार्यपद्धतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी







