दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी अदिराज एंटरप्रायझेसचा मदतीचा हात!मु ख्यमंत्री सहाय्यता निधीत ११ लाख ११ हजार १११ रुपयांची देणगी;
पुणे : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी अदिराज एंटरप्रायझेसच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ११ लाख ११ हजार १११ रुपयांची देणगी देण्यात आली. सामाजिक बांधिलकी जपत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेण्यात आला.
अदिराज एंटरप्रायझेसच्या वतीने जीवन बहिरट, आकाश घुले, राजेंद्र बाजारे आणि शिवम नायक यांनी पुणे येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन देणगीचा धनादेश सुपूर्द केला. या योगदानाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्वांचे आभार मानले.
शेतकऱ्यांच्या संकटाच्या काळात मदतीसाठी पुढे सरसावलेल्या या उपक्रमातून सामाजिक उत्तरदायित्वाची भावना अधोरेखित झाली आहे.
मथळा अधिक धारदार करा
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
Views: 46








