भिवंडीत समाजवादी पक्षात खळबळ; ६ नगरसेवकांची हकालपट्टी
भिवंडी : स्वीकृत नगरसेवक निवडीत पक्षादेश डावलून भाजप आमदार महेश चौघुले यांच्या समर्थकाला पाठिंबा दिल्याप्रकरणी समाजवादी पक्षाचे गटनेते आरिब शेख यांच्यासह सहा नगरसेवकांची प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांच्या आदेशानुसार पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. या कारवाईमुळे भिवंडीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पत्रकार : उमेश कुलकर्णी
Views: 31









