सुनील मोदी यांच्या उमेदवारीसाठी पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेची मोर्चेबांधणी


सुनील मोदी यांच्या उमेदवारीसाठी पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेची मोर्चेबांधणी

सुषमा अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी व शिवसैनिकांचा मेळावा उत्साहात

पिंपरी-चिंचवड : पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवार सुनील मोदी यांच्या उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरात संघटनात्मक मोर्चेबांधणी करण्यात आली. पिंपरी येथील कृष्णा पॅलेस येथे आयोजित पदाधिकारी व शिवसैनिकांचा मेळावा उत्साहात पार पडला.

या मेळाव्यात शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पुणे पदवीधर मतदारसंघातील निवडणूक, मतदानाचे नियोजन आणि उमेदवार सुनील मोदी यांच्या प्रचारासाठी करावयाच्या संघटनात्मक कामाबाबत चर्चा करण्यात आली.

तसेच आगामी दसरा मेळाव्यासाठी दादर येथे जाण्याचे नियोजन आणि शहरातील प्रत्येक प्रभागात आरोग्य शिबिरे आयोजित करण्याबाबतही विचारविनिमय करण्यात आला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक कामाला गती देण्यावर यावेळी भर देण्यात आला.

या वेळी माजी आमदार गौतम चाबुकस्वार, अशोक वाळके, दिलीप सावंत, अनिल दुराफे, सोमी सिंधू यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

प्रतिनिधी विजय अडसूळ


66
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!