टाकळीभान येथील विमा प्रतिनिधी अर्जुन राऊत यांचा झोनल मॅनेजर (वेस्टर्न झोन) ट्रॉफी देऊन सन्मान ..


टाकळीभान येथील विमा प्रतिनिधी अर्जुन राऊत यांचा झोनल मॅनेजर (वेस्टर्न झोन) ट्रॉफी देऊन सन्मान

टाकळीभान प्रतिनिधी श्रीरामपूर: तालुक्यातील टाकळीभान येथील गेल्या २४ वर्षापासून सातत्याने भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी)ची विश्वासू व प्रामाणिकपणाने सातत्याने विमा सेवा देत असलेले विमा प्रतिनिधी अर्जुन भाऊसाहेब राऊत यांचा श्रीरामपूर एलआयसी शाखेतर्फे झोनल मॅनेजर (वेस्टर्न झोन) ट्रॉफी स्पर्धा जिंकल्याने ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी श्रीरामपूर शाखेचे वरिष्ठ शाखाधिकारी नामदेव कानडे, विकास अधिकारी किरण बागुल यांच्या हस्ते त्यांना ट्रॉफीचे वितरण करण्यात आले.

प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर


66
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!