औषधनिर्मिती संशोधनाला महाराष्ट्रात चालना औषधनिर्मिती संशोधनासाठी महाराष्ट्रात अनुकूल


औषधनिर्मिती संशोधनाला महाराष्ट्रात चालना
औषधनिर्मिती संशोधनासाठी महाराष्ट्रात अनुकूल वातावरण : मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई : औषधनिर्मिती क्षेत्रातील संशोधन, नावीन्य आणि जागतिक सहकार्याला चालना देण्यासाठी महाराष्ट्रात अनुकूल वातावरण निर्माण केले जात आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यांच्या हस्ते मुंबई येथे ॲस्ट्राझेनेका फार्मा इंडिया लिमिटेडच्या नवीन मुख्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
कोविड-१९ महामारीच्या काळात भारताने ‘कोविड मैत्री’ उपक्रमातून ९९ देशांना लसींचा पुरवठा करून जागतिक स्तरावर महत्त्वपूर्ण योगदान दिले. कर्करोगावरील प्रभावी उपचारांसाठी संशोधन आवश्यक असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
भारतीय औषधनिर्मिती उद्योगाची जागतिक क्षमता अधोरेखित करताना त्यांनी आरोग्यसेवा अधिक सुलभ, परवडणारी आणि दर्जेदार करण्यासाठी नावीन्यपूर्ण संशोधनावर भर दिला. ॲस्ट्राझेनेकाने महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्था व विद्यापीठांशी भागीदारी करून संशोधनाला चालना द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी आमदार अतुल भातखळकर, ॲस्ट्राझेनेकाचे आशिया विभागाचे उपाध्यक्ष अरुण कृष्णा, भारतातील अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक प्रवीण राव अक्किनेपल्ली यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


66
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!