शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे खटाव तालुक्यात भव्य ‘महादौड’चे आयोजन; शिवभक्तांमध्ये मोठा उत्साह


शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे खटाव तालुक्यात भव्य ‘महादौड’चे आयोजन; शिवभक्तांमध्ये मोठा उत्साह
​खटाव (प्रतिनिधी):
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, खटाव तालुक्याच्या वतीने श्री शिवछत्रपती व धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानाच्या स्मरणात आणि युवा पिढीमध्ये राष्ट्रभक्ती व शिवरायांचे विचार रुजवण्यासाठी भव्य ‘महादौड’ चे आयोजन करण्यात आले आहे.
​या महादौडीची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:
​दिनांक -18/9/2026
वेळ – सकाळी 7वाजता
​प्रारंभ स्थान: छत्रपती शिवाजी महाराज चौक खटाा
​प्रमुख वैशिष्ट्ये व कार्यक्रम:
​भगवा ध्वज अन् जयघोष: हातात भगवा ध्वज आणि “छत्रपती शिवाजी महाराज की जय”, “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय” या जयघोषाने परिसर दुमदुमून निघणार आहे.
​तरुणांचा उस्फूर्त सहभाग: या महादौडीमध्ये खटाव तालुक्यातील शेकडो ध्येयधारेकरी, युवक-युवती आणि शिवप्रेमी नागरिक पारंपरिक पोशाखात सहभागी होणार आहेत.
​मार्गक्रमण व स्वागत: महादौडीच्या मार्गावर विविध ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने पुष्पवृष्टी करून व रांगोळ्या काढून स्वागत केले जाईल.
​ध्येयमंत्र व आरती: दौडीचा सांगता समारंभ सामूहिक ध्येयमंत्र आणि श्री शिवछत्रपतींच्या आरतीने होईल.
​शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या स्थानिक धारकऱ्यांनी खटाव तालुक्यातील सर्व शिवप्रेमी, देशप्रेमी नागरिक आणि तरुणांनी या महादौडीत मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे नम्र आवाहन केले आहे.

प्रतिनिधी जीवन इंगळे


66
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!