दिवाळीत एसटी प्रवाशांना मोठा दिलासा; १५ टक्के हंगामी भाडेवाढ रद्द!


दिवाळीत एसटी प्रवाशांना मोठा दिलासा; १५ टक्के हंगामी भाडेवाढ रद्द!

मुंबई : दिवाळीच्या सणात एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) दिवाळी हंगामातील प्रस्तावित १५ टक्के हंगामी भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भाडेवाढीचा प्रस्ताव फेटाळल्याने १ ते १५ नोव्हेंबरदरम्यान एसटीच्या तिकिटांमध्ये कोणतीही वाढ होणार नाही. महागाई आणि दुष्काळग्रस्त जनतेवर आर्थिक भार पडू नये, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


66
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!