MPSC पेपरफुटी प्रकरणी राज्य सरकारचा मोठा निर्णय; पाच सदस्यीय चौकशी आयोगाची स्थापना!


MPSC पेपरफुटी प्रकरणी राज्य सरकारचा मोठा निर्णय; पाच सदस्यीय चौकशी आयोगाची स्थापना!

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांमधील कथित पेपरफुटी आणि विविध गैरप्रकारांच्या चौकशीसाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या प्रकरणांची सखोल चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय चौकशी आयोग स्थापन करण्यात आला आहे.
या आयोगात निवृत्त न्यायमूर्ती पी. डी. नाईक, सनदी अधिकारी तुकाराम मुंढे, निवृत्त अधिकारी गणेश पाटील आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी लखमी गौतम यांचा समावेश आहे. तुकाराम मुंढे यांच्याकडे आयोगाच्या सचिवपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
नऊ परीक्षांतील गैरप्रकारांची चौकशी
MPSC च्या विविध परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटल्याच्या, उत्तरतालिका गळतीच्या तसेच अन्य अनियमिततेच्या आरोपांची चौकशी केली जाणार आहे. औषध निरीक्षक, गट-ब, गट-क, कृषी सेवा आणि अभियांत्रिकी सेवांसह नऊ परीक्षांमधील गैरप्रकारांची तपासणी करण्याचा उल्लेख वृत्तांत करण्यात आला आहे.
या प्रकरणांमध्ये आयोगाचे विद्यमान आणि माजी अध्यक्ष, सदस्य, अधिकारी, कर्मचारी तसेच संबंधित व्यक्तींच्या भूमिकेचीही चौकशी केली जाणार आहे.
दोन महिन्यांत अहवाल सादर होणार
शासनाच्या अधिसूचनेनुसार, आयोगाने अधिसूचना जारी झाल्यापासून दोन महिन्यांच्या आत चौकशी अहवाल सादर करायचा आहे. या चौकशीमुळे MPSC परीक्षांमधील कथित गैरप्रकारांची वस्तुस्थिती स्पष्ट होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


66
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!